ओरोस ग्रा. पं. च्या उपसरपंचपदी पांडूरंग मालवणकर बिनविरोध

Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: December 03, 2024 10:44 AM
views 127  views

सिंधुदुर्गनगरी : भाजपाची सत्ता असलेल्या ओरोस बु. ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी पांडुरंग उर्फ अमोल मालवणकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. या निवडीनंतर ओरोस सरपंच आशा मुरमुरे व माजी पंचायत समिती सदस्या सुप्रिया वालावलकर यांनी त्यांचे अभिनंदन केले.

माजी उपसरपंच महादेव उर्फ गौरव घाडीगावकर यांनी अंतर्गत नाराजीतून राजीनामा दिलेल्याने रिक्त झालेल्या उपसरपंच पदासाठी तहसीलदार कार्यालयाकडून निवडणूक लावण्यात आली होती. ओरोस सरपंच आशा मुरमुरे यांच्याच अध्यक्षतेखाली ही निवडणूक पार पडली. त्यामध्ये गेली अनेक वर्षे सामाजिक कार्यात कार्य करणारे व ग्रा. पं. सदस्य म्हणून काम करणारे पांडुरंग उर्फ अमोल मालवणकर यांचा एकमेव अर्ज उपसरपंच पदासाठी आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली

ओरोस ग्रामपंचायत कार्यालयामध्ये झालेल्या या निवडीच्यावेळी सरपंचांसह माजी जि. प. अध्यक्षा दीपलक्ष्मी पडते, दादा साहील, देवेंद्र सामंत, माजी पंचायत समिती सदस्या सुप्रिया वालावलकर, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश देसाई, गौरी योंद्रे, राजश्री नाईक, तेजश्री राऊळ, भक्ति पळसमकर, पुजा मालवणकर, प्रिय आजगावकर, श्रीमका सावंत, रसिका बंजारे, ग्राम विकास अधिकारी सरीता धामापूरकर, मदन परय, सुहास परब, महादेव परब, सिद्धेश परय, वनिता जुवेकर, सौ. कोचरेकर, डॉ सावंत, श्री, केळूसकर आदी उपस्थित होते. सर्वांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.