
दोडामार्ग : दोडामार्ग शहरातील सुरुचीवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते प्रकाश उर्फ बाळा कोरगांवकर ( वय ६२) यांचे शुक्रवारी रात्री उशिरा बांबोळी गोवा येथे अल्पशा आजाराने उपचार दरम्यान निधन झाले.
त्यांच्या निधनाचे वृत समजताच दोडामार्ग तालुक्यातील विविध पक्षांचे राजकीय पदाधिकारी व कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते तसेच दोडामार्ग शहरातील नागरिक, व्यापारी यांनी शनिवारी सकाळी त्यांच्या निवासस्थानी जात त्यांचे अंत्य दर्शन घेतले. त्यांच्या पश्चात पत्नी, भाऊ, भावजया, दोन मुलगे, पुतणे, पूतण्या असा मोठा परिवार आहे. कसई दोडामार्ग नगरपंचायत माजी नगरसेविका रेश्मा कोरगांवकर यांचे ते दिर होते. प्रकाश उर्फ बाळा कोरगांवकर यांच्या निधनामुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.