शिवसेना मळेवाड जि. प. युवा संघटकपदी नितीन कळंगुटकर

Edited by: विनायक गांवस
Published on: November 12, 2024 21:05 PM
views 63  views

सावंतवाडी : शिवसेना मळेवाड जिल्हा परिषद मतदार संघ युवा संघटक पदी नितीन कळंगुटकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना तालुकाप्रमुख नारायण राणे यांनी सोमवारी ही नियुक्ती केली. 

नितीन कळंगुटकर हे सामाजिक कार्यात तसेच पर्यावरण प्रेमी म्हणून कार्य करत असून त्यांनी कित्येक समस्या शासनदरबारी पोहोचवत जनतेला न्याय मिळवून दिला. त्यांच्या कार्याची दखल घेत शिवसेना तालुकाप्रमुख नारायण राणे यांनी त्यांची मळेवाड जिल्हा परिषद मतदारसंघ युवा संघटकपदी नियुक्ती केली. हे नियुक्तीपत्र त्यांना प्रदान करण्यात आले. यावेळी जिल्हाप्रमुख अशोक दळवी, तालुकाप्रमुख नारायण राणे, शहरप्रमुख बाबु कुडतरकर, महिला शहरप्रमुख भारती मोरे, उपसंघटक राजन रेडकर, प्रविण चौगुले आदी पदाधिकारी उपस्थित होते.