गांगेश्वर पावणाई भावई मंदिर देवस्थानचा हरीनाम सप्ताह

Edited by: नागेश दुखंडे
Published on: November 12, 2024 16:54 PM
views 161  views

देवगड : श्री देव गांगेश्वर पावणाई भावई देवस्थान च्या वार्षिक हरिनाम सप्ताह आज असून हे देवगड तालुक्यातील दाभोळे येथील अतिशय जागृत देवस्थान आहे. माहेरवासियांच्या संकटाला धावून जाणारी आणि भक्तांच्या नवसाला पावणारी अशा या विश्वाच्या माऊलीची सर्वत्र ख्याती आहे. या मंदिरामध्ये आज १२ जाने.रोजी कार्तिक महिन्याच्या प्रबोधिनी एकादशी दिवशी सप्त प्रहरांचा हरिनाम सप्ताह सकाळी ८.वाजल्या पासून (जत्रोत्सव) साजरा होत आहे. 

१९५६ साली या मंदिराचा जिर्णोद्धार करण्यात आला. याच मंदिर परिसरातील मंदिराच्या दर्शनी बाजूला  सुसज्ज असा देखणा आकर्षक सभामंडप आहे. श्री पावणादेवी देवालयाचा परिसर अतिशय सुंदर आहे. मंदिराचे प्रवेशद्वार पूर्वाभिमुख आहे. भावय मंदिरात भावयच्या उजव्या बाजूला घाडी वसाच्या दैवतेची स्थापना आहे. त्याच्या बाजूला जैना ची स्थापना आहे.आणि देवीच्या दरवाजासमोर तुळशी वृंदावनाकडे 84 च्या चाळ्याची स्थापना केली आहे. तसेच राजस्त्तेच्या  चाळ्याची स्थापना आहे.तसेच पूर्वसत्तेच्या चाळ्याची स्थापना आहे.तसेच पूर्व जात जे काय वस होऊन गेले त्यांची पूर्वी होऊन गेलेली डीक माळआहे.मंदिराच्या समोर मारुतीची स्थापना आहे.पूर्वी १० गावच्या दिंड्या यायच्या त्या वेळी हजारो माणस यायची आता मात्र दींड्या गावच्याच असतात बारा पाच माणकऱ्यान कडून हि राठी चालू आहे. या देवीची नित्य पूजा अर्चा घाडी करतात तर आकाराची पूजा ही धुरी करतात या मंदिराची स्थापना सुमारे ४०० ते ५०० वर्षांपूर्वी केलेली आहे. शिवाजी महाराज्यांच्या काळापासून काही धार्मिक विधी सालावादी वार्षिक केले जाते प्रत्येक  महिन्याला विविध वार्षिकप्रमाणे विधिपूर्वक धार्मिक कार्यक्रम केले जातात हे पांडव कालीन मंदिर असून बांधणी देखील पांडव कालीन आहे. सभामंडपात लाकडांपासुन तयार केलेले नक्षीदार खांब सभामंडपाची शोभा वाढवतात या. मंदिराच्या सुशोभीकरणनाचे काम बाकी आहे.

श्री .देव गांगेश्वर पावणाई भावई देवस्थान देवालयाच्या गाभाऱ्यात देवीच्या पूर्व दिशेला रवळनाथ आहे.पश्चिमेला भूमी आकार त्याच्या बाजूला देवीचा खुनी आहे. देवीच्या समोर इठला देवी नवलाई देवी त्या पुढे राठीच्या नितकऱ्याची स्थापना केलेली दिसून येते देवीच्या समोर देवीच्या पूर्व समंधाची स्थापना आहे. तसेच पाच खांब काठ्या शिव कळा घेतात त्या आहेत तसेच पुरूवस देवीच्या पश्चिमेस आहे.तसेच आकराकडे आठवले ब्राम्हणाचे एक वाशिक आहे.तसेच धुरीवसाची कुलदैवत आहे.तसेच बाहेर सभा मंडपात नंदी असून गणेशाची स्थापना केली आहे. तसेच लक्ष्मी  नारायणाची स्थापना करण्यात आली आहे.राठी मर्यादेच्या चौकडीची स्थापना आहे.नैवेद्याने देवस्थानातील वार्षिकांना सुरुवात होते. दसरा (नवरात्रोत्सव), भावई उत्सव,पोवती पौर्णिमा, देसरूड, हरिनाम सप्ताह, त्रिपुरारी पौर्णिमा, होलिकोत्सव,कवळणे आदी उत्सव व वार्षिक बारा-पाच मानकरी, ग्रामस्थ मंडळी मिळून साजरे करतात. या देवीच्या कृपाशीर्वादामुळे दरवर्षी भाविकांची संख्या वाढत आहे.त्यामुळे देवालयाच्या सौंदर्यांत भर पडली आहे.