
दोडामार्ग : दोडामार्ग बांदा राज्यमार्गावरील मणेरी येथे चाळण झालेल्या रस्त्याचे अखेर खड्डे बुजविण्यास सुरुवात झाली आहे. कोकणसादची बातमी आणि मणेरी ग्रामस्थ - उपसरपंच विशाल परब यांच्या मागणीला अखेर यश आल्याने त्यांचे सर्व वाहन चालकातून कौतुक केले जात आहे.
दोडामार्ग बांदा मार्गावर मणेरी येथे पावसाळ्यात रस्त्याची अक्षरशः चाळणच झाली होती. रत्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते अशी अवस्था झाली होती. कोकणसाद लाईव् ने या विषयावर आवाज उठवला होता. मणेरी ग्रामस्थ व उपसरपंच विशाल परब यांनी घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाला डेडलाईन देऊन आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानंतर पाऊस असल्याने रस्त्याचे काम रखडल्याने मणेरी ग्रामस्थ व वाहन चालक पुन्हा आक्रमक झाले व त्यानंतर बांधकाम विभागाने रस्त्यावर खडी टाकून दोन दिवसांपासून रस्त्यावरील खड्डे बुजवीण्यास सुरवात केली. आज मणेरी ग्रामस्थ व वाहन चालक यांनी समाधान व्यक्त करत कोकणसाद LIVEचेही आभार व्यक्त केले.