
दोडामार्ग : निवडणूक पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांची दोडामार्ग पोलीस ठाणे येथे भेट दिली. या भेटीदरम्यान दोडामार्ग पोलीस ठाणे नेमणुकी सर्व अधिकारी अंमलदार यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या.
विधानसभा निवडणूक येत्या काही दिवसात जाहीर होण्याची शक्यता असल्याने हद्दीतील चेक पोस्ट कार्यरत ठेवून प्रभावी देखरेख ठेवून बेकायदेशीर दारू वाहतूक तसेच इतर बेकायदेशीर वाहतूक यांच्यावर कडक कारवाई करावी करणेच्या सूचना दिल्या.
तसेच निवडणुकीच्या कालावधीमध्ये सर्वांनी आपले कर्तव्य सतर्कतेने करणे याबाबत योग्य त्या सूचना दिल्या. दोडामार्ग पोलीस ठाणे हद्दीतील कायदा व सुव्यवस्था याबाबत आढावा घेऊन पोलीस ठाणे दाखल गंभीर गुन्ह्यांचा थोडक्यात आढावा घेतला व त्याबाबत मार्गदर्शन केले.
तसेच निवडणूक कालावधीमध्ये जास्तीत जास्त प्रतिबंधक कारवाई करण्याबाबत तसेच वरिष्ठ अर्ज गुन्हे यांची पेंडन्सी काढण्याबाबत सूचना देऊन अमूल्य मार्गदर्शन केले.