
देवगड : नवरात्रोत्सवानिमित पंचायत समिती देवगड गटविकास अधिकारी वृक्षाली यादव मॅडम यांचा महिला कर्मचारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच प्रत्येक विभागातील महिलां प्रतिनिधींचा सन्मान गटविकास अधिकारी वृक्षाली यादव मॅडम यांच्या हस्ते झाला.
या कार्यक्रमांअंतर्गत संध्याकाळी खास महिलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम ( गरबा ) चे आयोजन करण्यात आले होते या सांस्कृतिक कार्यक्रमात गटविकास अधिकारी वृक्षाली यादव मॅडम व पुरुष अधिकारी व कर्मचारी वर्गांनेही सहभाग दाखवत कार्यक्रमात रंगत आणली.
हा कार्यक्रम गटविकास अधिकारी वृक्षाली यादव , सहाय्यक गटविकास अधिकारी मुकेश सजगाने यांच्या मार्गदर्शनाखाली तर कक्ष अधिकारी संतोष बिर्जे , विस्तार अधिकारी अंकुश जंगले, अधिक्षक कुणाल मांजरेकर , अधिक्षक मेधा राणे यांच्या संकल्पनेतुन संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे प्रस्तावना कक्ष अधिकारी संतोष बिर्जे सुत्रसंचालन विनायक धुरी तर आभार मधुसुदन घोडे सरांनी मानले .