शिवसेना पेंडूर विभागप्रमुखपदी शिवा भोजने

आमदार वैभव नाईक, माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देत केले अभिनंदन
Edited by: दिपेश परब
Published on: October 08, 2024 12:41 PM
views 291  views

सिंधुदुर्गनगरी :  शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पेंडूर विभागप्रमुख पदी शिवा भोजने यांची निवड करण्यात आली आहे. आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही निवड करण्यात आली.यावेळी त्यांना नियुक्तीपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले

         शिवसेना पेंडूर विभाग संघटना वाढीसाठी आपण प्रयत्न करून आमदार वैभव नाईक यांना येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त मताधिक्य देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे शिवा भोजने यांनी सांगितले.

       यावेळी शिवसेना माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, जिल्हा प्रवक्ते मंदार केणी, उपतालुकाप्रमुख पराग नार्वेकर, यतीन खोत, पंकज वर्दम, रुपेश आमडोसकर, बाबू टेंबुलकर, राहुल परब, मोरजकर आणि पेंडुर शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.