
सावंतवाडी : श्री देवी माऊली घोडेमुख युवक कला क्रिडा न्हावेली आणि पंचदेवी पार्सेकरवाडी व टेंबवाडी आयोजित श्री देवी माऊली नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या नवोदित भजन स्पर्धेत श्री भवानी भजन मंडळ न्हावेली रेवटेवाडी ( बुवा अक्षय जाधव ) यांनी प्रथम क्रमांक पटकावला. ईसवटी भजन मंडळ मातोंड, भरभरेवाडी ( बुवा . सुशांत परब ) व्दितीय क्रमांक श्री विघ्नहर्ता भजन मंडळ,न्हावेली दळवी परिवार ( बुवा कमलेश दळवी ) तृतीय क्रमांक तर अष्टविनायक भजन मंडळ पार्सेकरवाडी ( बुवा सिद्धेश पार्सेकर ) यांना मिळाला.
उकृष्ट गायक - अक्षय जाधव ( श्री भवानी भजन मंडळ, रेवटेवाडी ) उकृष्ट हार्मोनियम - विठ्ठल नाईक ( माऊली भजन मंडळ, देऊळवाडी ) उकृष्ट पखवाज - लाडू मसुरकर ( ईसवटी भजन मंडळ,मातोंड ) उकृष्ट तबला - कपिल धाऊसकर ( भवानी भजन मंडळ, रेवटेवाडी ) उकृष्ट झांजवादक - अक्षय गावडे ( श्री देव भूतनाथ भजन मंडळ,निरवडे ) उकृष्ट कोरस - श्री देवी भजन मंडळ,रेवटेवाडी ) यांना मिळाला. स्पर्धेत एकूण सात संघानी सहभाग घेतला.परीक्षक म्हणून विजय माधव माजगाव यांनी काम पाहिले.सूत्रसंचालन मोहन पालेकर यांनी केले.