गेळे ग्रामस्थांना उद्या जमीन वाटपास सुरुवात : सागर ढोकरे

पालकमंत्री रवींद्र चव्हाण, मंत्री केसरकर यांची असणारं उपस्थिती
Edited by: विनायक गांवस
Published on: October 08, 2024 10:51 AM
views 223  views

सावंतवाडी : गेळे कबुलायतदार गावकर जमिनीचा प्रश्न सुटला असून उद्या ग्रामस्थांना जमीन वाटप होणारं आहे. तसेच जमीन वाटपासाठी लागणाऱ्या मोजणीचा शुभारंभ सुध्दा यावेळी होणारं आहे. या कार्यक्रमाला पालकमंत्री रवींद्र चव्हाण, शिक्षणमंत्री दीपक केसरकर, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, संदीप गावडे, विधानसभा अध्यक्ष राजन तेली, यांच्यासह भाजप कार्यकर्ते गेळे ग्रामस्थ उपस्थित राहणार आहेत. 

सकाळी ११:३० वाजता बॅरिस्टर नाथ पै सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे.याबाबतची माहिती गेळे सरपंच सागर ढोकरे यांनी दिली आहे.यामुळे गेळे गावात आनंदाचं वातावरण आहे.