
सावंतवाडी : सावंतवाडी शहरातील रस्ते म्हणजे प्रशासकीय कारभारावर पडलेला काळा डाग आहे असा गंभीर आरोप माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केला आहे.
काही दिवसापूर्वी सावंतवाडी शहरामध्ये आंदोलन केल्यानंतर तात्पुरती मलमपट्टी करण्यात आली. परंतु नागरिकांच्या रिक्षाचालक वाहनचालक यांच्या यातना काही संपलेल्या नाहीत. भ्रष्ट अधिकारी भ्रष्ट ठेकेदारांवर कारवाई झालेली नाही. मुख्याधिकाऱ्यांनी पूर्ण याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. स्वच्छतेच्या बाबतीतही अशम्य गलथानपणा सुरु आहे. स्वच्छतेच्या बाबतीमध्ये शहराची घडी कोलमडली असून सकाळच्या वेळेत घंटागाड्या दारोदारी कचरा गोळा करण्यासाठी जायच्या या व्यवस्थेमध्ये कोलमडून टाकण्या मध्ये कोणाचा हात आहे ?घंटागाडी अकरा बारा दुपारच्या एक वाजेपर्यंत लोकांच्या घरापर्यंत पोहोचतच नाही. सरकारी कर्मचारी नोकरदार वर्गा नोकरीच्या निमित्ताने सकाळीच बाहेर पडून जातात. घंटागाडी पोहोचते एक वाजता, परिणामी शहरांमध्ये ठिकठिकाणी कचरा दिसत आहेत. त्यामुळे मुख्याधिकाऱ्यांनी गलथान कारभाराची सुधारणा करावी. प्रशासकीय बैठका घेऊन जुन्या फाइल्सवर लक्ष टाकावा. व्यवस्था कशी होती, शहर स्वच्छता कशी होती ? हे पहावे. आज करोड रुपये स्वच्छतेवरती खर्च घालून स्वच्छता का होत नाही ? शहरातील कुत्र्यांच्या झुंडीच्या झुंडी फिरत आहेत. यामुळे नागरिक त्रस्त झाले आहे. स्ट्रीट लाईट ठिकठिकाणी बंद पडलेल्या दिसतात.
शहरातील सार्वजनिक रस्ते शौचालय स्ट्रीट लाईट तसेच कुत्र्यांचा बंदोबस्त करा अन्यथा पुन्हा नगरपरिषदेला धडक द्यावी लागेल आणि याची पूर्ण जबाबदारी प्रशासक म्हणून प्रशासनावरती राहील असा इशारा माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी दिला आहे.