
देवगड : देवगड तालुक्यातील विजयदुर्ग किल्ला येथे डाॅ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा यांच्या वतीने साफसफाई मोहीम करण्यात आली होती.
डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा यांनी आज पर्यंत अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहेत. वाढत्या प्रदूषणाला आळा घालुन पर्यावरणाचे संवर्धन व संरक्षण करून ऐतिहासिक वारसा जपणे ही काळाची गरज आहे. आपल्या जिल्ह्यातील गडकिल्ले संवर्धन करणे व पुढील पिढीला त्याची जाणीव करुन देणे महत्त्वाचे आहे.पर्यावरणाच्या संरक्षण व संवर्धनासाठी डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा ता. अलिबाग जि. रायगड यांच्या वतीने पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी व रायगड भूषण डॉ.सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शना खाली श्री बैठकीच्या माध्यमातून सामाजिक व पर्यावरण पूरक असे विविध उपक्रम जिल्हा, राज्य तसेच देशपातळीवर राबविले जातात.यापैकीच गडकिल्ले संवर्धनउपक्रमाअंतर्गत प्रतिष्ठान तर्फे दिनांक १ऑक्टोबर २०२४ रोजी संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील श्रीबैठकी मधील ९२५ श्रीसदस्यांनी एकत्र येऊन विजयदुर्ग किल्ला परीसर स्वच्छता मोहीम राबवन्यात आली होती.
यावेळी देवगड तहसीलदार श्रीकृष्ण ठाकूर,पोलीस निरीक्षक विजयदुर्ग सोनवलकर सरपंच विजयदुर्ग. रियाज काझी, विजयदुर्ग प्रेरणोत्सव समितीचे अध्यक्ष . प्रसाद देवधर, मा. पुरातत्व विभागाचे अधिकारी . मनोज एखनकर, ए. एस. आय. कर्मचारी यशपाल जैतापकर आणि प्रशासानातील अधिकारी व लोकप्रतिनिधी, तसेच स्थानिक ग्रामस्थ मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी संपूर्ण जिल्हयातून ७ तालुक्यानमधून २६ श्रीबैठका सहभागी झाल्या होत्या.