
सावंतवाडी : विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठीच 'स्वरधारा' कार्यक्रमांचे योगदान महत्त्वाचे आहे. कोकणची ही लाल माती म्हणजे कला, साहित्य, संगीत व नाट्य क्षेत्रातील माहेरघर आहे. याची जाणीव ठेवून स्वर्गीय प्रा.मिलिंद भोसले यांनी आपल्या संकल्पनेतून आणि प्रयत्नातून 'श्रावणधारा' या कार्यक्रमाची सुरुवात केली. ही परंपरा अखंडितपणे सुरू ठेवण्याचे कार्य आजपर्यंतच्या सर्व सांस्कृतिक कमिटी प्रमुखांसहित, प्राचार्य,उपप्राचार्य,प्राध्यापक व विद्यार्थी यांचे यशस्वी प्रयत्न कौतुकास्पद असून तसेच असे प्रयत्न प्रत्येक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय आणि महाविद्यालयांमधून अशा प्रकारचे कार्यक्रम राबविण्यासाठी केले पाहिजे असे प्रतिपादन राणी पार्वतीदेवी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, सावंतवाडी येथील 'नवरंग कलामंच' येथे सांस्कृतिक कमिटी मार्फत आयोजित 'स्वरधारा' या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी शिक्षण प्रसारक मंडळ, सावंतवाडीचे संचालक व शालेय समिती अध्यक्ष अमोल सावंत यांनी केले.
कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली. तर प्रशालेचे मुख्याध्यापक जगदीश धोंड यांनी शुभेच्छा देताना, या कार्यक्रमाचा हेतू विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठीच होता. तोच हेतू नजरेसमोर ठेवून 'स्वरधारा' कार्यक्रम दरवर्षी आयोजित केला जातो. यासाठी आम्हांला प्रोत्साहन, मार्गदर्शन आणि खंबीर आर्थिक पाठबळ हे शिक्षण प्रसारक मंडळ,सावंतवाडीचे अध्यक्षांसह सर्व पदाधिकारी यांच्या माध्यमातून नेहमीच होत असते. तेव्हा या सर्वांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करून 'स्वरधारा' या कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिले.
तदनंतर वसंत नाईक,अक्षय काटाळ,मोहन परब, हर्षद सांगळेकर, ऋचा पिळणकर, रेवा पित्रे, भक्ती मेस्त्री, श्रेया नाईक इ. सहभागी विद्यार्थी गायकांनी एकापेक्षा एक अशा सुंदर सुरेल मराठी, हिंदी गाण्यांचे व अभंगांचे सादरीकरण करून उपस्थित विद्यार्थी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. तसेच या कार्यक्रमाला वादक म्हणून लाभलेले प्रा.निलेश कळगुंठकर व कु.हर्षद सांगळेकर यांनी उत्तम साथ दिली.या कार्यक्रमाला व्यासपीठावर उपमुख्याध्यापिका संप्रवी कशाळीकर, उपप्राचार्य डॉ.
सुमेधा नाईक,सांस्कृतिक कमिटी प्रमुख प्रा.विनिता घोरपडे. तर प्रेक्षकांमध्ये ज्येष्ठ प्रा. दशरथ राजगोळकर, प्रसिद्धी कमिटी प्रमुख प्रा.रणजीत राऊळ ,प्रा. डाॅ. संजना ओटवणेकर,प्रा.संतोष पाथरवट, प्रा. डॉ. अजेय कामत, प्रा.पवन वनवे,प्रा.दशरथ सांगळे,प्रा. वामन ठाकूर, प्रा. रणजीत माने,प्रा. सविता कांबळे.प्रा. महाश्वेता कुबल प्रा.स्मिता खानोलकर प्रा. माया नाईक,प्रा.स्पृहा टोपले ,प्रा.जोसेफ डिसिल्वा,प्रा. राहुल कदम,प्रा. विजय सावंत, प्रा.निलेश कळगुंठकर,प्रा. प्रियंका खाडे, प्रा.ज्योती सावंत प्रा.दिपा मोरजकर, प्रा. पुनम वाडकर इत्यादी व मोठ्या प्रमाणात विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. वर्षा जाधव, कु. स्वरांगी खानोलकर यांनी एकत्रित केले. आभार कॉलेजचे जी.एस.कु. भावेश सापळे यांनी मानले.