टाळसुरे विद्यालयाच्या श्रीराज रेवाळेची विभागीय मल्लखांबसाठी निवड

Edited by: मनोज पवार
Published on: October 03, 2024 11:29 AM
views 78  views

दापोली :  क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या विद्यमाने जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रत्नागिरी यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय मल्लखांब स्पर्धेत सह्याद्री शिक्षण संस्था सावर्डे च्या न्यू इंग्लिश स्कूल टाळसुरे विद्यालयाचा श्रीराज रेवाळे यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे.  

मिरज येथे होणाऱ्या विभागीय मल्लखांब स्पर्धेकरिता रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी श्रीराज याला प्राप्त झाली आहे.  श्रीराज रेवाळे याने 17 वर्ष वयोगटात चिपळूण पाग व्यायामशाळा येथे झालेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेत नेत्रदीपक कामगिरी केली. या कामगिरीच्या जोरावर रत्नागिरी जिल्ह्यातून निवडलेल्या चमूमध्ये श्रीराज रेवाळे याचा समावेश निवड समितीने केला आहे. तालुका क्रीडा संकुल मिरज वानलेस हॉस्पिटलच्या मागे दिनांक 15 ऑक्टोबर रोजी विभागीय मल्लखांब स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. 

या स्पर्धेकरिता श्रीराज रेवाळे याची निवड झाल्या बद्दल सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष आमदार शेखर निकम, सचिव महेश महाडिक, संचालक शांताराम खानविलकर, शालेय समितीचे अध्यक्ष जयवंत जालगावकर,  सदस्य अशोक जाधव, आप्पा खोत, प्रभाकर लाले, मुख्याध्यापक संदेश राऊत, मल्लखांब प्रशिक्षक विजय भुवड, क्रीडा शिक्षक समीर भोसले आदींनी विशेष कौतुक केले.