
सिंधुदुर्गनगरी : सुरक्षा रक्षक विविध शासकीय आस्थापनांन मध्ये कार्यरत सुरक्षा रक्षकांना खाकी वर्दी मिळाल्या नंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सिंधुदुर्ग येथील सुरक्षा रक्षकांनी एकमेकांना मिठाई भरून आनंद व्यक्त केला.
कामगार मंत्री सुभाष खाडे यांनी सोमवार दिनांक 30/ ० 9 / 2023 रोजी मंत्रालय ते बैठक घेऊन सुरक्षा रक्षकांना मुंबई महानगरपालिकेतील सुरक्षा रक्षकांप्रमाणे खाकी वर्दी जाहीर केली होती. आज मंगळवार दिनांक ०१/१०/२०२४ रोजी महाराष्ट्र शासनाजवळ तशा प्रकारचे सर्व सुरक्षारक्षक मंडळांना पत्र काढण्यात आल्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सिंधुदुर्ग येथील सुरक्षा रक्षकांनी एकमेकांना मिठाई भरून जल्लोष केला. बरेच वर्षापासून सुरक्षारक्षकांची खाकी वर्दी करावी ही असलेली मागणी पूर्ण केल्याबद्दल कामगार मंत्री सुरेश खाडे यांचे आभार मानले.