
वेंगुर्ले : आर. आर. (आबा) पाटील तालुका सुंदर गाव योजनेतंर्गत वेंगुर्ले तालुक्यातून केळूस गावाची निवड करण्यात आली आहे. तालुकास्तरावरील या निवडीमुळे केळूस गाव रुपये १० लाख रक्कमेच्या बक्षिसास पात्र झाली आहे.
गावात विविध घटकांच्या उन्नती करीता होत असलेली विकास कामे, गाव पातळीवर प्रशासकीय दृष्टीने सर्व विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येणारे उपक्रम, वैविध्यपूर्ण व नाविन्यपूर्ण पद्धतीने घेण्यात येणारे कार्यक्रम, केळूस गावातील सर्व ग्रामस्थांनी दिलेली भक्कम साथ व सहभाग, गावात कार्यरत असणारे सर्व पदाधिकारी व कर्मचारी यांनी केलेले मोलाचे सहकार्य तसेच वेंगुर्ले पंचायत समिती व सिंधुदुर्ग जिल्हा परिषद स्तरावरुन मिळालेले मार्गदर्शन या सर्वांच्या जोरावर केळूस गावाने आर. आर. (आबा) पाटील तालुका सुंदर गाव योजनेत सहभाग घेतला होता. जिल्हास्तरीय समितीकडून मुल्यमापन करुन गुणानुक्रमे आर. आर. (आबा) पाटील तालुका सुंदर गाव योजनेतंर्गत केळूस गावाची निवड करण्यात आली आहे.
केळूस गावाने यापूर्वी अनेक अभियानामध्ये सहभाग घेतला व विविध पुरस्कार पटकाविले आहेत. वेंगुर्ले तालुक्यातून आर. आर. (आबा) पाटील तालुका सुंदर गाव योजनेतंर्गत केळूस गावाची निवड झाल्याबद्दल सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.