गणित संबोध परीक्षेत सावंतवाडी 4 नं. शाळेचा 100 टक्के निकाल

Edited by: विनायक गांवस
Published on: September 28, 2024 12:00 PM
views 218  views

सावंतवाडी : गणित संबोध परीक्षेत जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा सावंतवाडी नं.4 शाळेचे उल्लेखनीय यश प्राप्त केले असून निकाल 100% तर 6 विद्यार्थ्यांना 100% गुण प्राप्त झाले आहे.

     

ऑगस्ट 2024 मध्ये घेण्यात आलेल्या गणित संबोध परीक्षेला या शाळेतील इयत्ता 5 वी मधील एकूण 13 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकाल 100% लागला आहे. तसेच उल्लेखनीय बाब म्हणजे सर्व विद्यार्थी  पुढील प्राविण्य परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत. या पैकी काव्या अमित तळवणेकर, वीरा राजीव घाडी, मानवी महेश घाडी, स्वरा गोविंद शेर्लेकर, पार्थ अशोक बोलके, हार्दिक अनिल वरक या सहा विद्यार्थ्यांनी 100% गुण मिळविले आहेत. या सर्व विद्यार्थ्यांना गणित विषय शिक्षक महेश पालव यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळा व्यवस्थापन समिती, पालकवर्ग यांनी विशेष अभिनंदन करून पुढील परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.