पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार पर्यटन दिन

Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: September 26, 2024 14:45 PM
views 227  views

सिंधुदुर्गनगरी :  महाराष्ट्र  पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने  दि. 27 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 10 वाजता प्रादेशिक पर्यटन कार्यालय, येथे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते जागतिक पर्यटन दिन  साजरा करण्यात येणार असल्याची माहिती पर्यटन विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी दीपक माने यांनी दिली. 

  या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, खासदार नारायण राणे, तर प्रमुख उपस्थिती विधान परिषद सदस्य निरंजन डावखरे, ज्ञानेश्वर म्हात्रे, विधानसभा सदस्य नितेश राणे, वैभव नाईक, जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्यकार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख, पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल, आणि पर्यटन महामंळाचे व्यवस्थापकीय संचालक मनोजकुमार सूर्यवंशी, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक  चंद्रशेखर जयस्वाल, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे वरिष्ठ व्यवस्थापक संजय ढेकणे आदी मान्यवर उपस्थितीत राहणार आहेत.