
वैभववाडी : तालुका खरेदी विक्री संघाच्यावतीने शेती आणि शेतीपुरक व्यवसायासाठी देण्यात येणार विविध पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.या शेतकऱ्यांना उद्या सर्वसाधारण सभेत मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे.
वैभववाडी तालुका खरेदी विक्री संघाच्यावतीने दरवर्षी तालुक्यात शेती आणि शेतीपुरक क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी विविध पुरस्कार दिले जातात. यावर्षी या पुरस्कारांची घोषणा तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष तथा पणन महामंडळाचे संचालक प्रमोद रावराणे यांनी केली. यावेळी त्यांच्यासोबत संचालक महेश रावराणे,व्यवस्थापक सिध्देश रावराणे आदी उपस्थित होते.
पुरस्कार पुढील प्रमाणे-उत्कृष्ट भातपिक शेतकरी-आत्माराम अच्युत खाड्ये (नानीवडे)उत्कृष्ट काजु पिक शेतकरी-हिंदुराव श्रीधर पाटील (करूळ), ऊस उत्पादक शेतकरी-मोहन सखाराम रावराणे (आचिर्णे), प्रयोगशील शेतकरी-रविंद्र सुदाम गावडे (नापणे), पशुपालक शेतकरी-रविंद्र सुर्याजी साळुंखे (कुसुर), भरडधान्य उत्पादक शेतकरी गट-कन्यारत्न उत्पादक महिला समुह (नावळे) यांना पुरस्कार जाहीर झाले आहेत. या सर्व शेतकऱ्यांचा उद्या बाबासाहेब आंबडेकर भवन येथे होणाऱ्या सर्वसाधारण सभेत सन्मान करण्यात येणार आहे. याशिवाय वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार मिळालेले शेतकरी मंगेश कदम यांचा देखील सत्कार करण्यात येणार आहे.