
देवगड : नगरपथ विक्रेता समितीच्या देवगड जामसंडे नगरपंचायत निवडणूकित भाजपा प्रणित पॅनल बिनविरोध निवडून आले आहे. देवगड जामसंडे नगरपंचायत तालुका देवगड नगरपथ विक्रेता समिती सदस्य निवडणूक पार पडली असून यामध्ये भाजप प्रणित पाच सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत.
यामध्ये अर्जुन तातोबा रामाणे, सर्वसाधारण गटातून, स्मिता सुधाकर सावंत महिला सर्वसाधारण गटातून, केदार गुरुनाथ शिवगण, सर्वसाधारण गटातून, दीपक देवराज कुवळेकर इतर मागास प्रवर्ग घटकातून तर प्रवीण विठ्ठल देवगडकर अनुसूचित जाती गटातून बिनविरोध निवडून आले आहेत.
या समितीमध्ये आठ सदस्य आहेत मात्र तीन जागा रिक्त राहिल्या आहेत. यावेळी उपनगराध्यक्ष मिताली सावंत, भाजपाचे गटनेते शरद ठुकरुल युवा सेलचे शहराध्यक्ष दया पाटील, नगरसेविका प्रणाली माने यांच्यासह अनेक भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.