
दोडामार्ग : झोळंबे येथील भागिरथी शंकर गवस (वय ७९ वर्षे ) यांचे आज दि. २४ सप्टे. रोजी पनवेल येथे वृद्धापकाळाने निधन झाले. आज दु. ३वा. पनवेल येथेच अंत्यसंस्कार करण्यात आले. शिवसेना तालुका प्रमुख गणेशप्रसाद गवस यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या पश्चात चार विवाहीत मुली, जावई, एक मुलगा, पुतणे, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.