देवगडात कलाकारांचा मेळावा !

शासनाच्या कलाकार मानधन योजनेचे मंजुरी पत्र प्रदान
Edited by: नागेश दुखंडे
Published on: September 23, 2024 13:11 PM
views 190  views

देवगड : देवगड जामसंडे येथील खरेदी विक्री संघ, येथे सिंधुदुर्गातील कलाकार मेळावा पार पडला. कार्यक्रमाच्या प्रास्ताविक डाॅ.भाई बांदकर यांनी केले. त्यांनी बोलताना सांगितले की कोकणात कलाकारांचे संघटन नसल्यामुळे कोकणातील कलाकारांना अनेक संकटाना सामोरे जावे लागते. कलाकारांसाठी शासनाच्या असलेल्या योजना कलाकारांपर्यंत पोहोचत नाही आणि एखादी योजना पोहोचलीच तर त्यासाठी लागणार्‍या कागदपत्रांसाठी अनेक अडचणी जाणवतात अगदी सध्या सुरु असलेल्या कलाकार मानधन योजनेची माहिती अद्याप कित्येक कलाकारांना माहित नाही म्हणूनच या मेळाव्यात मुख्यत: सर्व क्षेत्रातील कलाकारांची नोंदणी केली गेली आहे. देवगडला नाट्य परिषदेची शाखा सुरु करण्यासाठीही ही नोंदणी महत्त्वाची ठरणार आहे. देवगडमधील सर्व कलांमधील कलाकारांनी आपली नोंदणी विनामुल्य करावी असे आवाहन डाॅ.भाई बांदकर यांनी केले.

या मेळाव्यात भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्ग जिल्हा  सरचिटणीस तथा कणकवली विधानसभा संयोजक संदिप साटम, बाळा खडपे, .उल्हास रेवडेकर, डाॅ.गुरुदेव परुळेकर तसेच सिंधु ग्राम विकास फाऊंडेशनचे उपाध्यक्ष डाॅ.कृष्णा बांदकर, भाजपा किसान मोर्चाचे देवगड मंडल उपाध्यक्ष जितेंद्र उपरकर उपस्थित होते. देवगड व परिसरातील ज्येष्ठ व श्रेष्ठ कलाकार बहुसंख्येने उपस्थित होते.या ॲड.अजित गोगटे, .कौस्तुभ जामसंडेकर यांनी कार्यक्रमास हाॅल उपलब्ध करुन दिला. सागर बांदकर, सतीश जाधव, संतोष जुवाटकर यांचेही सहकार्य लाभले. या कलाकार मेळाव्याचे आयोजन सिंधु ग्राम विकास फाऊंडेशन व भाजपा किसान मोर्चा यांनी केले.

या कलाकार मेळाव्याचे मुख्य संयोजक कलादिग्दर्शक व पिंपरी-चिंचवड नाट्य परिषद व साहित्य परिषद शाखेचे माजी कार्यवाह डाॅ.गणेश उर्फ भाई बांदकर हे होते. कलाकार मानधन समितीचे सिंधुदुर्गचे अध्यक्ष संतोष कानडे यांनी मानधनाची रुपरेषा व या योजनेसाठी लागणाऱ्या कागपत्राची आवश्यकता यावर मार्गदर्शन केले.उपस्थितांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली या योजनेत जास्तीत जास्त कलाकारांनी सहभाग घ्यावा असे आवाहन केले. 

या कलाकार मेळाव्यासाठी आवर्जुन उपस्थित राहून विशेष मार्गदर्शन आमदार नितेश राणे यांनी केले.  सर्वप्रथम त्यांनी शासनाच्या या कलाकार मानधन योजनेचे कौतुक आमदारांनी केले, पुढे ते म्हणाले की देवगडमध्ये या शासन योजनेत अनेक कलाकार आहेत त्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, यासाठी मी स्वतः व कलाकार मानधन कार्यरत टीम आपणांस वेळोवेळी मार्गदर्शन करेल. अशा कलाकार मानधनासाठीच्या कलाकार मेळाव्याचे कौतुकही आमदारांनी आपल्या भाषण समारोपात केले. प्रमुख अतिथी ॲड.अजित गोगटे यांनी आपल्या भाषणात देवगडमधील जास्तीत जास्त कलाकारांना मानधन मिळवुन देण्याचा आम्ही प्रयत्न करु तसेच अ.भा.मराठी नाट्य परिषदेची शाखा लवकरात लवकर देवगडमध्ये होण्यासाठी शुभेच्छा दिल्या ते पुढे म्हणाले की नाट्य परिषद किंवा कलाकार महासंघ यामधून तळागाळातील कलाकारांना प्रोत्साहन मिळेल. चारुदत्त सोमण यांनी आमले यांची ओळख करुन दिली नंतर देवगडमधील कलाकारांनी सिने क्षेत्रात कशी आघाडी घेतली. तसेच नाट्य आणि सिनेसृष्टीतील महत्वाच्या कलाविषयक संस्था यावर भाष्य .अमरजीत आमले – सिनेनिर्माते व अभिनेते यांनी केले. 

शेवटी सर्व कार्यक्रमाचा आढावा घेवून उपस्थितांचे व मान्यवरांचे आभार डाॅ.गुरुदेव परुळेकर यांनी मानले. याच कार्यक्रमात देवगडमधील पुर्वी अर्ज केलेल्या सात जणांना कलाकार मानधन मंजुरीचे पत्र आमदार नितेश राणे यांच्याहस्ते प्रदान  करण्यात आले तसेच प्रातिनिधिक स्वरूपात जमलेल्या जेष्ठ कलाकारांचे सत्कार देखील यावेळी करण्यात आला.