कणकवली मतदारसंघाचा 25 सप्टेंबरला जनता दरबार

Edited by: नागेश दुखंडे
Published on: September 23, 2024 12:40 PM
views 150  views

 देवगड  : १२ ऑगस्ट रोजी ओरोस - जिल्हा नियोजन सभागृहामध्ये पालकमंत्री  रविंद्र चव्हान यांनी जनता दरबार घेतला होता. यामध्ये आलेल्या एकून ७८ अर्जापैकी ७४ अर्जांचे तातडीने निराकरण करण्यात आले होते. यामुळे अशाच पद्‌धतीचा पुन्हा एकदा येत्या बुधवारी दि.२५ सप्टेंबर रोजी जिल्हा नियोजन सभागृह-ओरोस येथे पालकमंत्री तथा राज्याचे बांधकाम मंत्री  रविंद्र चव्हाण, तसेचे कणकवली देवगड वैभववाडी विधानसभा मतदार संघाचे आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत जनता दरबार सकाळी १० ते. दुपारी ३ या वेळेत होणार आहे. तरी देवगड कणकवली आणि वैभववाडी या तिन्ही तालुक्यातील जनतेने आपल्या असलेल्या समस्या लेखी तक्रार घेवून उपस्थित रहावयाचे आहे. 

जेणेकरून जनतेच्या प्रश्नांचे तातडीने निराकरण करण्यात येईल. या ठिकाणी जिल्हाधिकारी,मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हातील सर्व विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे लोकांच्या समस्या तात्काळ दूर करण्याचा  प्रयत्न या जनता दरबारात होणार आहे. यासाठी या जनता दरबाराचा जास्तीत जास्त जनतेने उपस्थित रहावे असे आव्हाहन भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्ग जिल्हा  सरचिटणीस तथा कणकवली विधानसभा संयोजक संदिप साटम यांनी प्रसिद्धी पत्राद्वारे आवाहन केले आहे.