
सावंतवाडी : निगुडे गावातील कंत्राटी वायरमन गुरु कुडव यांना शॉक लागून पडल्याने दुखापत झाली होती. त्यांच्या वैद्यकीय उपचारासाठी दीपकभाई केसरकर मित्रमंडळाकडून दहा हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली. यावेळी तालुकाप्रमुख नारायण राणे, बुथप्रमुख जनार्दन परब, गुरु पाटील, कानजी राणे आदी उपस्थित होते.