चिपळूणचे गोडबोले क्लासेसचे अमेय गोडबोलेंना पुरस्कार जाहीर

Edited by: मनोज पवार
Published on: September 21, 2024 11:26 AM
views 169  views

 चिपळूण :  येथील गोडबोले क्लासेसचे संस्थापक संचालक अमेय गोडबोले यांना पुणे येथील बेलगावे फाउंडेशन सांगली आणि ग्लोबल स्कॉलर्स फाउंडेशन पुणे यांच्यातर्फे 'भारतीय समाजरत्न सोशल एज्यूकेटर ऑफ द इअर' राष्ट्रीय पुरस्कार व खेड येथील रिजनल टीचर ऑर्गनायझेशन यांच्यातर्फे 'महाराष्ट्र आयडियल टीचर ऑफ द इअर' हा राज्यस्तरीय पुरस्कार घोषित करण्यात आला आहे.


अमेय गोडबोले हे गोडबोले क्लासेसच्या माध्यमातून गेल्या १३ वर्षांपासून विद्यार्थी घडवण्याचे काम करत आहेत.. ते क्लासव्यतिरिक्त विद्यार्थी, पालक व इतर नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध शैक्षणिक व सामाजिक विषयावर मान्यवरांची व्याखाने, प्रशिक्षणे आयोजित करतात. त्यांच्या क्लासमध्ये सातवी ते बारावी माध्यमिक बोर्ड, सीबीएसई, इंग्रजी, सेमी इंग्रजी, मराठी माध्यमातील मुलांना त्यांच्या बुध्दीनुसार विशेष मार्गदर्शन देऊन शैक्षणिक प्रगतीसाठी प्रोत्साहित केले जाते. त्यांच्या क्लासने १०० टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. इतर संस्थांमध्येही गोडबोले अध्यापनाचे काम करतात.


त्यांच्या एकूण शैक्षणिक व सामाजिक कामामुळे या अगोदरही त्यांना 'ग्यानभूषण, आयडॉल ऑफ महाराष्ट्र गुरुवंदना, गोवा येथील राष्ट्रीय आदर्श शिक्षक आदी पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. त्यांना हे दोन्ही पुरस्कार २९ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता पुणे व खेड येथे काळकाई मंदिर, भरणे येथे एकाचवेळी वितरित केला जाणार आहे. त्यांना मिळालेल्या या दोन्ही पुरस्कारांमुळे पालक, विद्यार्थी व इतर मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन केल जात आहे.