
सिंधुदुर्गनगरी : कुडाळ तालुक्यातील पंचायत समिती येथील कार्यालयात कार्यरत असलेले कृषी अधिकारी बाळकृष्ण परब यांची सिंधुदुर्ग जिल्हा परिषद मनरेगा येथे सहाय्यक गटविकास अधिकारी पदी बढती झाली आहे. शासनाने नुकत्याच केलेल्या बढती प्रक्रियेत त्यांची वर्णी लागली आहे.
बाळकृष्ण परब हे कुडाळ पंचायत समिती येथील कृषी कार्यालयात अधिकारी पदावर कार्यरत होते. जिल्हा परिषद मनरेगा कार्यालयात लवकरच आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारतील. परब यांच्या पदोन्नतीला सर्वच अधिकारी, कर्मचारी, मित्रपरिवारांतर्फे, अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.