मी दीपकभाईंचा एकनिष्ठ कार्यकर्ता : कृष्णा लाखे

Edited by: विनायक गावस
Published on: September 19, 2024 15:41 PM
views 85  views

सावंतवाडी : भाजपची नुकतीच कार्यकारणी बैठक पार पडली. त्या बैठकीमध्ये विविध पदांच वाटप करण्यात आलं. त्यामध्ये विनाकारण माझ्या नावाचा उल्लेख केला गेला. मात्र, मी मंत्री दीपक केसरकर यांचा एकनिष्ठ कार्यकर्ता आहे. त्यांनी मला शहर उपसंघटक हे पद दिले आहे. त्यानुसार जबाबदारीने मी काम करत आहे अस मत कृष्णा लाखे यांनी मांडत खुलासा केला आहे‌.


आमचा समाज मंत्री दीपक केसरकर यांच्या पाठीशी ठामपणे कायम उभा राहील. माझ्या समाज बांधवांचा व माझा इतर कोणत्याही पक्षाशी संबंध नाही. मंत्री केसरकर यांनी माझ्यावर दिलेली जबाबदारी मी यशस्वीरित्या पार पडणार आहे. आमच्या समाजाला दीपक केसरकर यांचाच एक मोठा आधार आहे. विनाकारण माझ्या समाज बांधवांमध्ये गैरसमज होऊ नये व माझ्या नावाची बदनामी होऊ नये यासाठी मला हा खुलासा करावा लागत आहे असं कृष्णा लाखे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे मांडल आहे.