इनामदार पावणाई मंदिरात २२ पासून अखंड हरिनाम सप्ताह

Edited by: नागेश दुखंडे
Published on: September 19, 2024 14:20 PM
views 66  views

देवगड  : देवगड तालुक्यातील इनामदार श्री पावणाई देवी देवालय साळशी येथे २२ सप्टेंबर पासून अंखड हरिनाम सप्ताहास सुरूवात होणार आहे.

 देवगड तालुक्यातल्या  ऐतिहासिक वारसा लाभलेल्या  साळशी येथील इनामदार श्री देवी पावणाई देवालयात रविवार २२ सप्टेंबर ते शनिवार २८ सप्टेंबर या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.या  निमित्ताने सांयकाळी ७ ते ९ या वेळेत येणाऱ्या भजनी मंडळींसाठी महाप्रसादाची सोय देखिल करण्यात आलेली आहे, अशी माहिती देण्यात आली आहे. 

या हरिनाम सप्ताहात भजनी मंडळींनी दिंड्या घेऊन सहभागी व्हावे पांडुरंगाच्या दर्शनाचा लाभ घेऊन हरिनाम सप्ताहाची शोभा वाढवावी असे समस्त ग्रामस्थ मंडळी, बारा – पाच मानकरी व देवस्थान विश्वस्त समिती यांच्यावतीने  आवाहन करण्यात आले आहे.