
दोडामार्ग : सासोली जमीन घोटाळा प्रकरणी संदेश पारकर यांनी पत्रकार परिषद घेऊन महसूल विभाग व इतर अधिकारी यांच्यावर निलंबनाची कारवाई करा अशी मागणी करत 24 सप्टेंबर रोजी जन आंदोलन करण्याचे घोषित केले आहे. या त्यांच्या आंदोलनाला आम्ही सासोली ग्रामस्थ पूर्णपणे आंदोलनात सहभागी होणार असल्याचे मनोज गवस यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले आहे.
त्यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले की सासोली येथे द ओरिजिन सासोली या कंपनीने जमीन घोटाळ्यात सर्व सासोली गावाला फसवले आहे. मोठा आर्थिक घोटाळा केला आहे. याला सर्वस्वी दोडामार्ग महसूल विभाग कृषी, भूमी या सारखे अनेक अधीकारी सामील आहेत. त्यांच्यावर निलंबनाची कारवाई व्हावी अशी मागणी दोन दिवसांपूर्वी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संदेश पारकर यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले होते. सासोली गावातील ग्रामस्त यांना न्याय देण्यासाठी जे आम्हाला मदत करतील त्यांना आम्ही पूर्णपणे पाठिंबा देऊ असे यावेळी मनोज गवस यांनी सांगितले.