
देवगड : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून दि. २ ऑक्टोबर २०२४ हा दिवस स्वच्छ भारत दिवस (SBD) म्हणून साजरा केला जाणार आहे. त्या निमित्ताने स्वच्छता हि सेवा (SHS) २०२४ मोहीम दि. १७ सप्टेंबर २०२४ ते दि.१ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत राबविण्यात येणार आहे. या वर्षीच्या स्वच्छता हि सेवा २०२४ साठी “स्वभाव स्वच्छता,संस्कार स्वच्छता” हि थीम निश्चित केली असुन ही मोहीम यशस्वी करण्यासाठी देवगड तालुक्यातील सर्वांनी सहभागी व्हा असे आवाहन गटविकास अधिकारी देवगड वृक्षाली यादव यांनी केले आहे .
या वर्षीच्या स्वच्छता हि सेवा २०२४ साठी “स्वभाव स्वच्छता,संस्कार स्वच्छता” हि थीम निश्चित केली आहे. त्या अनुषंगाने स्वच्छता हि सेवा पंधरवडा कालावधीमध्ये विविध उपक्रम राबविण्याबाबत राज्यशासन व केंद्र शासनाच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार पुढिल प्रमाणे जिल्हयात विविध दैनंदिन उपक्रम राबविण्यात येणार आहेत. १७ सप्टेंबर २०२४ रोजी स्वच्छता हि सेवा अभियानाचा शुभारंभ तालुका व जिल्हास्तरावर मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. सफाई मित्र सुरक्षा शिबीर या उपक्रमाद्वारे सफाई मित्रासाठी एक खिडकी योजनेद्वारे सर्व योजनांच्या अनुषंगाने पात्र लाभार्थ्यांकारिता मोहीम राबविण्यात येणार आहे. १९ सप्टेंबर २०२४ रोजी एक दिवस श्रमदानासाठी, हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. जिल्हयातील सार्वजनिक ठिकाण, कार्यालय, संस्थात्मक इमारती, व्यावसायिक व बाजारपेठे, सार्वजनिक वाहतुक केंद्रे, प्रमुख रस्ते व महामार्ग,पर्यटन स्थळ,रेल्वे स्थानके, धार्मिक, अध्यात्मिक स्थळे, प्राणी संग्रहालय,राष्ट्रीय उद्याने व अभयारण्ये,ऐतिहासिक वास्तू,वारसा स्थळे,नदी किनारे,घाट,नाले या ठिकाणांची साफसफाई ग्रामस्थ. NSS व NCC. विविध मंडळे. सामाजिक संस्था व विद्यार्थी याचे मार्फत करण्यात येणार आहे.
गावातील खाऊ गल्ली किंवा बाजार पटांगणामध्ये स्वच्छतेच्या अनुषंगाने मोहीम राबविणे स्वयंस्फुर्तीने लोकसहभागाच्या माध्यमातून शास्त्रयुक्त पद्धतीने कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात येणार आहे. जिल्ह्याच्या संस्कृतीनुसार संस्कृतिक कार्यक्रमात पथनाट्ये व कलापथक यांची स्वच्छतेच्या अनुषंगाने जनजागृती कार्यक्रम आयोजित करणेत येणार आहे. कार्यक्रमाकरिता गर्दीच्या ठिकाणांची निवड करण्यात येणार आहे. प्लास्टिक जनजागृतीसाठी एकल प्लास्टिक न वापरणे बाबत जनजागृती करण्यात येणार आहे. सर्व कुटुंबांना गृहभेटीद्वारे जनजागृती करून एक झाड आईच्या नावे उपक्रम राबविण्यात येणार आहे.तसेच तालुकास्तरावर सन्मा. मा. खासदार व आमदार स्थानिक लोकप्रतिनिधी सर्व विभागाचे अधिकारी कर्मचारी शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी यांच्या उपस्थिती स्वच्छता ज्योत, स्वच्छता दौड,स्वच्छता सायकल स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत. गावामध्ये टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू तयार करणे. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी यांची टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू तयार करणेबाबत स्पर्धा घेण्यात येणार आहेत. गावातील सार्वजनिक शौचालयाची साफसफाई व दुरुस्ती करण्यात येणार आहे. कायम अस्वच्छ व दुर्लक्षित ठिकाणांची साफसफाई करण्यात येणार आहेत. वैयक्तिक स्तरावर कंपोस्ट खत/ शोष खड्डा निर्मिती करण्यात येणार आहे. २९ सप्टेंबर २०२४ रोजी स्वच्छ भारत मिशन (ग्रा) अंतर्गत निर्मिती करण्यात आलेल्या प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात येणार आहे. स्वच्छतेचे वाहने व उपकरणे यांची स्वच्छता व सुशोभीकरण करण्यात येणार आहे. ०१ ऑक्टोबर २०२४ रोजी स्वच्छता प्रतिज्ञा घेण्यात येणार आहे. तर दि.२ ऑक्टोबर २०२४ रोजी ग्रामसभा घेवुन स्वच्छ माझे अंगण स्पर्धेतील सर्वोउत्तम कुटुंबास प्रमाणपत्र मा.सरपंच.उपसरपंच व ग्रामस्थ व मान्यवरांचया हस्ते वितरीत करणेत येणार आहे. तसेच या दिवशी स्वच्छ भारत दिवस म्हणून साजरा करणेत येणार आहे. या अभियान कार्यक्रमांत देवगडवासियांनी सहभाग घ्यावा असे आवाहन गटविकास अधिकारी देवगड वृक्षाली यादव यांनी केले आहे .