भारद्वाजचे शिल्प सेल्फी पॉइंटच्या ठिकाणी उभारा

देव्या सूर्याजी यांची मागणी
Edited by: विनायक गांवस
Published on: September 18, 2024 13:31 PM
views 187  views

सावंतवाडी : सावंतवाडीचा नागरी पक्षी भारद्वाज याचे शिल्प सेल्फी पॉइंटच्या ठिकाणी उभारण्यात यावे, अशी मागणी युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी यांनी केली आहे. याबाबत त्यांनी सावंतवाडी नगरपरिषद प्रशासनाचे व दीपकभाई केसरकर मित्रमंडळाचे लक्ष वेधले आहे. सेल्फी पॉईंटच्या माध्यमातून या शुभ व नागरी पक्षाचे दर्शन सर्वांना होईल असे मत श्री‌. सुर्याजी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे मांडले आहे.

श्रीराम वाचन मंदिरासमोरचा मोती तलाव येथील सेल्फी पॉईंट दीपक केसरकर मित्रमंडळाकडून व सावंतवाडी नगरपरिषदेकडून नव्याने उभारण्यात येत आहे. या सेल्फी पॉईंटवर सावंतवाडीचा नागरी पक्षी भारद्वाज याचे शिल्प उभारण्यात यावे, अशी मागणी युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी यांनी केली आहे. याबाबत त्यांनी सावंतवाडी नगरपरिषद प्रशासनाचे व दीपकभाई केसरकर मित्रमंडळाचे लक्ष वेधले आहे. भारद्वाज पक्षाचे एक उत्तम शिल्प येथे बसविले जाईल, यासाठी प्रयत्न व्हावे जेणेकरून सावंतवाडीचे प्रतीक असलेल्या या शुभ पक्षाचे सर्वांना दर्शन होईल अस मत देव्या सुर्याजी यांनी व्यक्त केले आहे.