लाखे वस्तीच्या नवरात्रोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी कृष्णा लाखे

Edited by: विनायक गांवस
Published on: September 18, 2024 09:14 AM
views 130  views

सावंतवाडी : लाखे वस्तीमध्ये नवरात्र उत्सव नऊ दिवस सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करून मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. यंदाचे हे 25 वे वर्षे आहे. याही वर्षी नऊ दिवस मोठ्या दिमाखात सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 

नियोजनबद्ध कार्यक्रम व शिस्तबद्ध व्यवस्थापनामुळे पुन्हा एकदा कृष्णा लाखे यांची पुढील तीन वर्षासाठी मंडळाचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. तर उपाध्यक्ष विकी लाखे, सचिव नितीन पाटील, खजिनदार  लखन पाटील व कार्याध्यक्ष रोहित लाखे यांची निवड करण्यात आली.