
सावंतवाडी : सोनुर्ली येथील सरपंच नारायण हिराप यांच्या निवासस्थानी जावून शिवसेना पदाधिकारी यांनी गणरायाचे दर्शन घेतले. तसेच गावागावात जात घरगुती गणपतींसह सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना त्यांनी भेटी देत गणरायाचे दर्शन घेतले.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी, शिवसेना तालुका प्रमुख नारायण राणे, संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष गजानन नाटेकर, मळगाव उपविभाग प्रमुख संदेश सोनुर्लेकर, माजी पंचायत समिती सदस्या सौ. पार्वती हिराप, संजय गावडे, एकनाथ हळदणकर, उपस्थित होते.