
देवगड : देवगड तालुक्यातील फणसगाव येथील जिल्हा परिषदची प्राथमिक शाळा फणसगांव – गुरवभाटलेच्या नूतन इमारतीचा उद्घाटन सोहळा युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या शुभहस्ते फीत कापून करण्यात आला. माजी जिल्हा परिषद सदस्य प्रदीप नारकर यांच्या पाठपुराव्यामुळे व ग्रामस्थांच्या अथक प्रयत्नातून या प्राथमिक शाळेची इमारत उभारण्यात आली. यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्यासोबत मा.जिल्हा परिषद प्रदीप नारकर, माजी विस्तार अधिकारी तिर्लोटकर, शमिका धुरी, पोलीस पाटील जयवंती नर, रमाकांत आंग्रे, बाळा लांजवळकर, तळेकर मॅडम, कांबळे सर, दीपक ठुकरूल आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्राथमिक शाळेच्या इमारतीसाठी रमाकांत आंग्रे यांनी आपली जमीन दिली आहे. सुशांत नाईक यांनी मा. जिल्हा परिषद सदस्य प्रदीप नारकर यांच्या कार्याचे कौतुक केले. व ग्रामस्थांच्या मेहनतीचे देखील कौतुक केले.