...तर सर्वसामान्यांनी कोणाकडे न्याय मागावा ? : मायकल डिसोझा

आठ दिवसांपासून आरोपींना अटक नाही
Edited by: विनायक गांवस
Published on: September 11, 2024 08:16 AM
views 265  views

सावंतवाडी : सावंतवाडी मतदारसंघांमध्ये मोठ्या प्रमाणात चोरी व इतर गुन्हेगारी कृत्य वाढत आहे. यात शासन म्हणून दीपक केसरकर यांचा कोणताही अंकुश नाही. कोलगाव मध्ये झालेल्या अक्षय साहिल यांच्या आत्महत्या संदर्भात मागील आठ दिवसापासून आरोपी  अटक होत नाही. त्यामुळे भाजपच्या नेत्यांना उपोषणाला बसण्याची वेळ आली आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता असणाऱ्यांना जर उपोषणाला बसण्याची वेळ येत असेल तर सर्वसामान्य जनतेने कोणाकडे न्याय मागावा ? ह्यातून हे सिद्ध होतंय की आमदार दीपक केसरकर यांचा प्रशासनावर कुठलाही अंकुश नाही अस टिकास्त्र उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे संघटक मायकल डिसोझा यांनी केले.


ते म्हणाले, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघचे आमदार तसेच राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचा 15 वर्षाच्या कारकीर्द निष्पळ व निष्क्रिय असे ठरली आहे. कोणतेही ठोस काम करू न शकलेले असे हे पंधरा वर्ष आमदार व साडेसात वर्ष मंत्री असून सुद्धा सर्वसामान्य जनतेचे प्रश्न त्यांना सोडवता आले नाहीत. यामुळे त्यांचे मित्रपक्षचे सर्व नेते त्यांच्यावर तुटून पडत आहेत. सर्वसामान्यांना मदत करतेवेळी कायम जमीन विकतो व राजकारण करतो असे रडत राहणारे व कधीच कोणतीही मदत न करणारे आमदारकीची निवडणूक जवळ आली की कशी काय मदत करतात व पैसा कुठून जमा करतात  हा एक संशोधनाचा विषय आहे असा खोचक टोला उबाठा शिवसेनेचे संघटक मायकल डिसोझा यांनी लागावाला. मी जमीन विकून राजकारण करतो असे कायम ओरडणारे ह्या वेळी स्वतःची कोणती जमीन विकली ती आताच जाहीर करावी‌. या  विधानसभामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा भगवा फडकणार आहे, निष्क्रिय आमदार यांचा पराभव आता नक्कीच  सर्वसामान्य जनता करणार आहे. मागील काही काळामध्ये सावंतवाडी मतदारसंघांमध्ये मोठ्या प्रमाणात चोरी व इतर गुन्हेगारी कृत्य मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यात  शासन म्हणून दीपक केसरकर यांचा कोणताही अंकुश नाही. हल्लीच कोलगाव मध्ये झालेल्या अक्षय साहिल यांच्या आत्महत्या संदर्भात मागील आठ दिवसापासून आरोपी  अटक होत नाही. त्यामुळे भाजपच्या नेत्यांना उपोषणाला बसण्याची वेळ आली आहे.

 गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता असणाऱ्यांना जर उपोषणाला बसण्याची वेळ येत असेल तर सर्वसामान्य जनतेने कोणाकडे न्याय मागावा, ह्यातून हे सिद्ध होतंय की आमदार दीपक केसरकर यांच्या प्रशासनावर कुठलाही अंकुश नाही अस ते म्हणाले. तर या सर्व प्रकरणात जर प्रशासनाने  तातडीने कारवाई केली नाही तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या घरासमोर व सिंधुदुर्ग  पोलीस अधिक्षक कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल असा इशारा श्री. डिसोजा यांनी दिला.