केसरकरांकडून निवडणूकीच्या तोंडावर बैठकांचा फार्स : बबन साळगावकर

Edited by: विनायक गांवस
Published on: September 11, 2024 08:14 AM
views 140  views

सावंतवाडी : व्यापारी संकुलातील भाडे आकारणी निर्णयाची बैठक हा निवडणुकीचा तोंडावर फार्स आहे. पंधरा वर्षे झोपला होता का ? पुढच्या वीस वर्षांतही सावंतवाडी शहरातील व्यापारी कॉम्प्लेक्स उभे राहू शकणार नाही असा टोला माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी हाणला. 

ते म्हणाले, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील जनतेला वाऱ्यावर सोडून मुंबई निवासी झालेले मंत्री दिपक केसरकर निवडणुकीच्या तोंडावर बैठकावर बैठका घेऊन जनतेची दिशाभूल करत आहे.आमदारांना सर्वसामान्य माणसं भेटायला आल्यानंतर वेळ नाही, माझं फ्लाईट चुकतंय मला जायचं आहे अशी कारण देऊन निघून जाणारे केसरकर हे आज बैठकांच्यावरती बैठका घेत आहेत. ही सगळी नाटकं लोक ओळखू आहेत ही सर्व नाटक बंद करावीत. केसरकर कुठच्याही गावात गेल्या पंधरा वर्षांमध्ये एक तासही थांबू शकलेले नाहीत. सर्वसामान्य नागरिकांना दुर्लक्षित केले. त्या नागरिकांना तुच्छ मानलं गेलं, मी पैसे देऊन निवडून येतो हा माज उतरवला गेला पाहिजे. आता शेवटच्या महिन्यात बैठका घेत आहेत. पंधरा वर्षे काय झोपला होता का असा सवाल श्री. साळगावकर यांनी केला.