
देवगड : देवगड एज्युकेशन बोर्ड संचलित मिलिंद सदानंद पवार पूर्व प्राथमिक शाळेत इयत्ता पहिली - दुसरी श्लोक पाठांतर स्पर्धा व तिसरी चौथीसाठी आरती लेखन स्पर्धा घेण्यात आल्या.
या स्पर्धा कै.सो.विजयालक्ष्मी आत्माराम राऊत यांच्या स्मरणार्थ घेण्यात आल्या या स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे श्लोक पाठांतर स्पर्धा कु. रिया हेमंत शिंगाडे प्रथम, जयेश बापू शेळके द्वितीय, नंदन ध्वजेंद्र मिराशी तृतीय (इयत्ता पहिली) मिहिर हेमंत जोशी प्रथम, अणव प्रविण खडपकर द्वितीय, पुण्यश्री जयेंद्र तीलोंटकर तृतीय (इयत्ता दुसरी) आरती लेखन स्पर्धा वर्धन निवास शिंदे प्रथम, आराध्य उदय परब द्वितीय, अस्मि सौरभ सहस्त्रबुद्धे तृतीय (इयत्ता तिसरी) राजवीर महेश घाडी प्रथम, सुयश उमेश कारेकर द्वितीय, प्रणव चेतन ठाकूर तृतीय (इयत्ता चौथी) या स्पर्धेचे परीक्षण पल्लवी पंडित,.निशा दहिबावकर तसेच सर्व वर्ग शिक्षकांनी केले.
तसेच मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षेत उज्वल यश प्राप्त केलेले दक्ष राकेश पेडणेकर, भार्गवी बापू शेळके (इयत्ता पहिली) वर्धन निवास शिंदे, मीरा सदाशिव भुजबळ, सिया सागर कडू (इयत्ता दुसरी) सार्थक गणेश गावकर, आराध्य दिनेश राणे, आयुष दिनेश राणे (इयत्ता तिसरी) सुयश सुदेश गोलतकर, विरा मनोज पारकर, कु.तनिष्क बाळकृष्ण कोयंडे, वेदिका बापू शेळके, स्वरा सुमित भिडे (इयत्ता चौथी), मुकुल प्रभू देसाई (इयत्ता पाचवी) सान्वी समीर मर्गज (इयत्ता सातवी) या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे रोप्य महोत्सवी समितीचे अध्यक्ष सदानंद पवार, स्थानीय समिती अध्यक्ष डॉ. बोरफळकर, सर्व कार्यकारिणी, मुख्याध्यापक महादेव घोलराखे पर्यवेक्षिका निशा दहीबावकर तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रियांका बांदकर यांनी केले. या कार्यक्रमास रौप्य महोत्सव समितीचे अध्यक्ष सदानंद पवार, स्थानिक समितीचे खजिनदार द. म. जोशी स्थानिक समितीच्या पदाधिकारी अनुश्री पारकर माजी मुख्याध्यापक संजीव राऊत व प्रशालेचे मुख्याध्यापक महादेव घोलराखे या कार्यक्रमास उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष द.म. जोशी म्हणाले अशा प्रकारच्या श्लोक व आरती पाठांतर स्पर्धामुळे विद्यार्थ्यांवर उत्तम संस्कार घडतात या पुढेही अशा प्रकारच्या स्पर्धा व्हाव्यात असे ते शेवटी म्हणाले. तसेच शिक्षक दिनाच्या निमित्ताने सर्व शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.