आनंदा बामणीकर यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान !

Edited by: संदीप देसाई
Published on: September 05, 2024 13:01 PM
views 22  views

सिंधुदुर्ग : आनंदा लक्ष्मण बामणीकर यांना महाराष्ट्र राज्याचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते या पुरस्काराचं वितरण करण्यात आलं. 

पाच सप्टेंबर 2024 रोजी शिक्षक दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत देण्यात येणारा क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार 2024 कार्यक्रम टाटा थिएटर नरिमन पॉईंट मुंबई येथे संपन्न झाला. पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, राज्याचे शालेय शिक्षण व क्रीडा मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते माध्यमिक शिक्षक विभागातून राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार मला मिळाला. पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व 110000/-(एक लाख दहा हजार) चा धनादेश प्रदान करण्यात आला.