
बांदा : भारताचे माजी राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून शिक्षकदिनी महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाच्या वतीने देण्यात येणारा क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार २०२४ हा पुरस्कार पीएम बांदा नं.१केंद्रशाळेचे उपक्रमशील शिक्षक जे.डी.पाटील यांना प्रदान करण्यात आला.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर , विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर, शिक्षण आयुक्त सुरज मांडरे, प्रधान सचिव आय ए कुंदन, राज्य प्रकल्प संचालक आर विमला आदि मान्यवरांच्या उपस्थितीत पाटील यांना सन्मानचिन्ह , मानपत्र, एक लाख दहा हजार रूपयांचा धनादेश देऊन सपत्नीक सन्मानित करण्यात आले.
पाटील यांनी गेल्या वीस वर्षांच्या कालावधीत दोडामार्ग तालुक्यातील माटणे नं.३ सासोली हेदूस व सध्या बांदा नं.१केंद्र शाळेत विविध नाविन्यपूर्ण असे उपक्रम राबवून राज्याच्या शैक्षणिक गुणवत्तेत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. यावेळी वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी राज्यातील महाराष्ट्र राज्यातील सर्व शिक्षक करत असलेल्या कार्याचे कौतुक करून सर्व शिक्षकांना शुभेच्छा दिल्या.