सिंधुदुर्गनगरी : 5 सप्टेंबर या शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचे जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाले असून, प्राप्त सतरा प्रस्तावांपैकी आठ जणांची निवड आदर्श शिक्षक पुरस्कारांसाठी करण्यात आली आहे. 5 सप्टेंबर या शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला शिक्षक पुरस्कार जाहीर झाले असले तरी प्रत्यक्ष हे पुरस्कार कधी दिले जातील याची तारीख किंवा महिना जाहीर करण्यात आलेला नाही.
पुरस्कार जाहीर करण्यात आलेल्यांमध्ये किशोर देऊ कदम,पदवीधर शिक्षक,जि.प.पू. प्राथमिक शाळा ओसरगांव नं. 1 ता. कणकवली, सुनील परशराम करडे,उपशिक्षक,जि.प.प्राथमिक शाळा कोलगांव नं.4 सावंतवाडी, संदिप सुरेश सावंत उपशिक्षक जि.प.प्राथमिक शाळा सासोली हेदूस ता. दोडामार्ग,श्रीम. नम्रता उदय गोसावी उपशिक्षक जि.प.प्राथमिक केंद्रशाळा वेतोरे नं १ वेंगुर्ला.मधुकर गोविंद शिंदे पदवीधर शिक्षक जि.प.पू. प्राथमिक शाळा वाडोस नं.१ ता. कुडाळ जि. सिंधुदुर्ग, श्री.शितल शामराव देवरकर उपशिक्षक,जि.प.प्राथमिक शाळा रामेश्वर ता. देवगड,प्रकाश दत्ताराम नारकर पदवीधर शिक्षक विदया मंदिर उपळे नं.१ ता. वैभववाडी .श्रीम. शितल पांडुरंग परुळेकर जि. प.प्राथमिक शाळा पेंडुर खरारे ता मालवण यांना जाहीर झाले आहेत.