
वैभववाडी : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्यावतीने दिला जाणारा आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी वैभववाडी तालुक्यातून प्रकाश नारकर यांची निवड झाली आहे. श्री.नारकर हे सध्या उपळे येथे कार्यरत आहेत.
मुळ कुसूर गावचे असलेले श्री नारकर यांनी सोनाळी, कुंभवडे येथे सेवा बजावली.या शाळांमध्ये त्यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच विविध खेळांमध्ये प्राविण्य प्राप्त करण्यास मार्गदर्शन केले होते. त्यामुळे जिल्हा स्तरावर त्याचे विद्यार्थी चमकले आहेत. शिक्षणातही विविध प्रयोग त्यांनी राबविले. त्यांच्या या कामगिरीबद्दल त्यांची यावर्षीच्या आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.