
देवगड : देवगड तालुक्यातील नाडण पुजारेवाडी येथील पराग गणेश पुजारे (२२)या युवकाने आपल्या राहत्या घरात गळफास लावून घेत आत्महत्या केली आहे.
हम हर रोज उदास होते हैं और रात गुजर जाती हैं, एक दिन रात उदास होगी और हम गुजर जायेंगे…!! असा इंस्टाग्राम वर त्याने त्यादिवशी चा अखेरचा स्टेटस ठेवीत जगाचा निरोप घेतला. नाडण पुजारेवाडी येथील पराग गणेश पुजारे याने गळफास लावून घेत आत्महत्या केली आहे.
पोलिसांन कडून मिळालेल्या माहितीच्या आधारे नाडण पुजारेवाडी येथील पराग गणेश पुजारे (22) याची आई आपल्या मुलीला उपचारासाठी घेऊन मुंबईला गेली होती. त्यामुळे घरी वडील व मुलगा असे दोघेजण होते. दरम्यान वडील कोठे बाहेर गेले होते. तेवढ्या वेळेत पराग याने आपल्या राहत्या घरी नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. आज बुधवारी सकाळी पराग याची काकिने सकाळी पराग याच्या खोलीचा दरवाजा नाश्ता देण्यासाठी वाजवला. मात्र परागने दरवाजा उघडला नाही. काकीने दरवाजा ढकलून आत प्रवेश केल्यावर तिला, तो गळफास लावलेल्या स्थितीत आढळला. पराग हा उत्तम वेल्डर होता. याबाबतची खबर त्याचे काका महेश मधुकर पुजारे यांनी देवगड पोलिसात दिली.
पोलिसांनी घटना स्थळी भेट देत रीतसर पंचनामा करून आकस्मिक मृत्यू अशी नोंद केली आहे. मृतदेह शविच्छेदनासाठी देवगड ग्रामीण रुग्णालयात पाठविला .मृतदेहाचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.देवगड पोलीस ठाणे मधील आशिष कदम हे या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.