
वैभववाडी : शहरात खड्डे बुजविण्यासाठी टाकलेल्या सिमेंटमुळे बाजारपेठेतील मुख्य रस्ता चिखलमय झाला आहे. सर्वत्र चिखल असल्याने रस्त्यावरून चालणं सध्या जिकीरीचे बनले आहे. पादचारी ग्राहकांना याचा मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
गणेशोत्सवानिमित्त शहरातील बाजारपेठेतील मुख्य रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम सुरू आहे. सिमेंट कॉक्रीटीकरणाने ते बुजवले जात आहे. मंगळवारी सायंकाळी संभाजी चौक व मच्छीमार्केटमधील खड्डे सिमेंटने भरले होते. मात्र पावसामुळे खड्यात भरलेलं सिमेंट न सुकल्यामुळे सर्व भाग चिखलमय झाला आहे. यामुळे या भागातून वाहतूक करणे व चालणे मुश्कील झाले आहे.