कारीवडे - भैरववाडीत गणेश मखर सजावट स्पर्धा

Edited by: विनायक गांवस
Published on: September 04, 2024 11:30 AM
views 104  views

सावंतवाडी : येथील कारिवडे - भैरववाडी येथे यावर्षी गणेश मखर सजावट स्पर्धेचे आयोजन येथील तरुण आणि हौशी मित्रमंडळ तर्फे करण्यात आले आहे. स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक बक्षिसे जाहीर करण्यात आली आहे.

या स्पर्धेचे प्रथम बक्षीस रक्कम रुपये ५,५५५/-, द्वितीय बक्षीस रक्कम रुपये ३,३३३/-, तृतीय बक्षीस रक्कम रुपये २,२२२/- असे असेल. त्याचप्रमाणे उत्तेजनार्थ बक्षीसेही जाहीर करण्यात येणार आहेत. ही स्पर्धा वाडी मर्यादीत असून तिची प्रवेश फी  १०१/- रुपये अशी नाममात्र असेल. ज्या स्पर्धकांना या स्पर्धेत भाग घ्यायचा आहे त्यांनी आपली नावे दिनांक ०६ सप्टेंबर पूर्वी

नोंदवावी. आपल्या वाडीतील ग्रामस्थांच्या आणि मुलांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात येत असून या स्पर्धेत मोठ्या संख्येने भाग घेऊन आपल्या सर्वांचा उत्साह वाढवावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.  नाव नोंदणीसाठी संपर्क 

रोहन साईल - 7066002059

योगेश साईल - 8412868034

संजय म. सावंत - 9404088826