
वैभववाडी : गणेश चतुर्थीनिमित्त वैभववाडी बाजारपेठ गुरुवारी पुर्ण दिवस सुरू असणार आहे. ग्राहकांची गैरसोय होऊ नये म्हणून तालुका व्यापारी संघटनेने हा निर्णय घेतला आहे अशी माहिती तालुका अध्यक्ष तेजस आंबेकर यांनी दिली.
तालुक्यातील मुख्य बाजारपेठ आठवडी बाजाराच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारी दुपारनंतर बंद असते. मात्र या आठवड्यात बाजारपेठेतील सर्व दुकाने सुरू असणार आहेत. गणेश चतुर्थीनिमित्त खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांची गैरसोय होऊ नये म्हणून व्यापारी संघटनेने हा निर्णय घेतला आहे.