आंतरराष्ट्रीय मानवाधिकार राजदूत संघटनेच्यावतीने जनजागृतीपर व्याख्यान

Edited by: नागेश दुखंडे
Published on: August 29, 2024 14:27 PM
views 192  views

देवगड : देवगड येथील न.श. पंत वालावलकर कनिष्ठ महाविद्यालय येथे आंतरराष्ट्रीय मानवाधिकार राजदूत संघटनेच्यावतीने समाजात घडत असलेल्या अनैतिक घटनांवर आधारित प्रकाशझोत टाकणारे जनजागृती पर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघटनेचे तालुकाध्यक्ष विलास रूमडे यांनी केले.       

 महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना राष्ट्रीय मानवाधिकार राजदूत संघटनेच्या महिला अध्यक्षा  शामल शामसुंदर जोशी यांनी समाजात अलीकडे महिलावर नियमितपणे घडतं असलेल्या अनैतिक अत्याचारावर सर्वांचे लक्ष वेधले.अशा प्रकारांवर आळा घालण्यासाठी समाजातील जनतेने जागरूक राहण्याची नितांत गरज असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.त्यावर शासनाच्या माध्यमातून कायद्याने कसे संरक्षण दिले आहे.हेही विशद करताना मदत करणाऱ्या शासकीय हेल्पलाइनचे नंबर व  मोबाईल ॲप माहीत करून दिले व जर असे प्रकार घडत असतील तर ठिकाणी उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांनी व पुरुषांनी  अत्याचारीत महिला किंवा विद्यार्थिनी ही आपली बहीण, मैत्रीण आहे.असे समजून त्यांना सहकार्य करण्यासाठी  पुढे गेले पाहिजे असे सूचित केले.

या वेळी शुभांगी राणे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना, आजची महिला ही आपले संरक्षण करण्यासाठी सक्षम झाली पाहिजे असे आव्हान केले. या प्रसंगी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर शरद शेटे यांनी विद्यार्थ्यानी नेहमी शिस्तीचे पालन करून ज्ञान अवगत करावे असे संबोधित केले. या उपक्रमात संघटनेचे तुकाराम तेली, रविकांत चांदोस्कर, गिरीश धोपटे, संतोष पांचाळ, जान्हवी नाथगोसावी, तेली, प्रा. रमाकांत बांदेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

 कार्यक्रमाच्या शेवटी संघटनेच्या हर्षा ठाकूर यांनी अबला महिला सबला झाल्या पाहिजेत असे म्हणत उपस्थित सर्वांचे आभार मानले.