
वेंगुर्ला : भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्या माध्यमातून शिरोडा येथील श्री देवी माऊली मंदिर सभागृह येथे आयोजित करण्यात आलेल्या मुख्यमंत्री वयोश्री योजना मोफत नोंदणी शिबीरला भरगोस प्रतिसाद मिळाला. या शिबिरात अवघ्या तीन तासाच्या नोंदणी मध्ये रेकॉर्ड ब्रेक ४०० पेक्षा जास्त लाभार्थ्यांनी लाभ घेतला.
भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष मा विशालजी परब यांनी मुख्यमंत्री वयोश्री योजना शिबिरास सदिच्छा भेट दिली असता मनोगत व्यक्त करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब व विद्यमान महायुती सरकारच्या नव नवीन लोकोपयोगी शासकीय योजनांचा लाभ प्रत्येक गरजू कुटुंबांपर्यंत पोहचविण्यासाठी अशा प्रकारच्या शिबिरांचे आयोजन गावागावात करणे आवश्यक असून अशा उपक्रमांना आपण नेहमीच सहकार्य करू. तसेच शिरोडा येथे रेडी जिल्हा परिषद विभागातील भाजप कार्यकर्त्यांना अशा योजना राबविण्यासाठी चांगल्या ऑफिस ची व्यवस्था करून देऊ असे आश्वासन या वेळी दिले.
या शिबिरा दरम्यान वेंगुर्ला पंचायत समिती विस्तार अधिकारी गुरुनाथ धुरी यांनी भेट देऊन मुख्यमंत्री वयोश्री योजना बाबत उपस्थित लाभार्थी व ग्रामस्थांना मार्गदर्शन करून एवढ्या मोठ्या प्रमाणात नाव नोदणी करून शिबिर यशस्वी केल्या बद्दल आयोजकांचे अभिनंदन केले. तसेच समाज कल्याण विभाग सिंधुदुर्ग जिल्हा परिषद वतीने सहाय्यक आयुक्त समाज कल्याण संतोष चिकने, समतादूत सुजित जाधव, वसतिगृह अधीक्षक कुणाल इंदलकर यांनी शिबिरास भेट देऊन फॉर्म भरण्याविषयी मोलाचे मार्गदर्शन केले.
या शिबिरात रेडी, शिरोडा, आरवली, सागरतीर्थ व इतर गावातील वयोवृध्द नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरा वेळी ६५० फॉर्म चे मोफत वाटप करण्यात आले व ४०० पेक्षा जास्त लाभार्थ्यांची नोंदणी केली गेली.
यावेळी जिल्हा परिषद माजी शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेश राऊळ, तालुका उपाध्यक्ष लक्ष्मीकांत कर्पे ,शिरोडा माजी सरपंच मनोज उगवेकर, माजी उपसरपंच राहुल गावडे, रेडी सरपंच रामसिंग राणे, रेडी उपसरपंच नमिता नागोळकर, आरवली सरपंच समीर कांबळी, माजी ग्रा.प.सदस्य अमित गावडे, ग्रा प सदस्य मयुरेश शिरोडकर, अर्चना नाईक, सुधीर नार्वेकर, शहर अध्यक्ष संदीप धानजी, युवा मोर्चा सोमकांत सावंत, शहर उपाध्यक्ष संतोष अणसुरकर, शक्तीकेंद्र प्रमुख महादेव नाईक, बाळू वस्त, विजय बागकर , विद्याधर धानजी, शेखर गोडकर , मनोज शारबिद्रे , विजय पडवळ, अशोक परब, सुमित मोंडकर, राजाराम म्हाकले ,नितीन तारी, स्वप्नील तोरस्कर, एकनाथ साळगावकर, दादा शेट्ये, योगेश वैद्य, नाना वस्त, अनिल गावडे, बाबल गावडे, उल्हास गावडे, ज्ञानेश्वर केरकर, महेश कोनाडकर, बाबू रगजी, शेखर गोडकर, मनोज शारबिद्रे तसेच भाजप चे अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
या वेळी शिरोडा ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकारी अमृत सागर, सरपंच लतिका रेडकर, उपसरपंच चंदन हाडकी, ग्रा.प सदस्य जगन बांदेकर, पांडुरंग नाईक, यांनी भेट देत शुभेच्छा दिल्या. शिरोडा माजी सरपंच मनोज उगवेकर यांनी उपस्थित मान्यवर , लाभार्थी तसेच शिबिर उपक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व पदाधिकारी , कार्यकर्ते व मित्र मंडळी यांचे आभार मानले. या शिबिराचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल उपस्थित ग्रामस्थ व मान्यवरांनी आयोजकांचे कौतुक केले.