वैभववाडी भाजपा तालुका सरचिटणीसपदी हुसेन लांजेकर

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: August 24, 2024 13:45 PM
views 184  views

वैभववाडी : भाजपा तालुका सरचिटणीसपदी हुसेन लांजेकर यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीनंतर तालुका अध्यक्ष सुधीर नकाशे यांनी त्यांचं अभिनंदन केले.

भाजपाच्या तालुकाध्यक्ष पदी सुधीर नकाशे यांची नुकतीच निवड झाली होती. यानंतर तालुका कार्यकारिणीतही खांदेपालट करण्यास सुरुवात केली आहे. युवामोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष असलेल्या हुसेन लांजेकर यांच्यावर तालुका सरचिटणीस पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. श्री.लांजेकर गेली अनेक वर्षे सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम करत आहेत. भाजपाच्या युवा मोर्चाचे तालुका व जिल्हा पातळीवर त्यांनी काम केले आहे. युवामोर्चाच्या माध्यमातून तरुणांचं मजबूत संघटनही केले.त्यांची ही कामगिरी पाहून त्यांना भाजपाच्या सरचिटणीसपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. या निवडीनंतर बोलताना श्री.लांजेकर म्हणाले, पक्षाचे संघटन आणखी मजबूत करण्यासाठी आम नितेश राणेंच्या नेतृत्वाखाली तालुक्यात काम करणार आहे.