
दोडामार्ग : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ भेडशीच्या अध्यक्षपदी युवा सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर टोपले यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. सातत्याने विविध स्तरावर भेडशी गावच्या विकासासाठी योगदान देणारे नंदकिशोर उर्फ नंदू टोपले यांच्या या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
यावर्षीच्या गणेशोत्सव नियोजनची सभा तेथील दामोदर सभागृहात नुकतीच संपन्न झाली यावेळी टोपले यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. सभेचे प्रस्ताविक निलेश तळणकर यांनी केले. सभेत चालू वर्षीच्या गणेशोत्सव कार्यक्रमाचे नियोजनाबाबत सविस्तर चर्चा झाली. 19 वर्षाची परंपरा असलेल्या गणेश मंडळाचा या वर्षीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्याचा नियोजनही करण्यात आलं आहे. गणेशोत्सव कालावधीत अकरा दिवसात आयोजित करण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांतर्गत पारंपरिक व धार्मिक कार्यक्रम बरोबर सामाजिक बांधिलकी जपणारे कार्यक्रम आयोजित करण्याचे नियोजनही करण्यात आले असल्याची माहिती टोपले यांनी दिली आहे. तसेच आपले सहकारी, ग्रामस्थ आणि युवा वर्ग यांनी अध्यक्षपदी निवड करून बाप्पा चरणी सेवा करण्याची संधी दिल्या बद्द्लही धन्यवाद व्यक्त केले आहेत.