खेडामध्ये तोंडाला काळ्या फिती बांधून निषेध

Edited by: नागेश दुखंडे
Published on: August 24, 2024 12:40 PM
views 197  views

खेड : राज्यातील महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटना, बदलापूर प्रकरणातील राज्य सरकारची असंवेदनशीलता, गृह विभागाचे अपयश व राज्यातील ढासळती कायदा-सुव्यवस्था याविरोधातील जनसामान्यांचा आक्रोश सरकार पर्यंत पोहोचवण्यासाठी बदलापूर घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने काळ्या फिती लावून निषेध करण्यात आला. तसेच त्या नराधमाला लवकरात लवकर फाशी होण्यासाठी तहसीलदार तसेच पोलीस निरीक्षक यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने शिवसेना जिल्हाप्रमुख, माजी आमदार  संजयराव कदम यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले.


 यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख  विजयराव जाधव, दापोली विधानसभा संघटक प्रभाकर कदम, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाप्रमुख  विनायक निकम, शिवसेना शहरप्रमुख  दर्शन महाजन, माजी नगराध्यक्ष  अरविंदशेठ तोडकरी, खेड नगरपरिषद मजी गटनेते बाळा खेडेकर, काँग्रेस पर्यावरण समिती जिल्हाध्यक्ष किरण तायडे, काँग्रेस शहराध्यक्ष अनिल सदरे, माजी नगरसेवक  बशीर मुजावर, अनिल विचारे, खेड शहर महीला संघटिका माधवी बेर्डे, मिनल पाटणे, माजी पं. स. सदस्य  प्रकाश मोरे, राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार शहर प्रमुख  प्रणव मापुसकर, युवक अध्यक्ष सुरेश जोगळे, कमर मुकादम, विराज जैन, आय टी सेल अधिकारी  मधुर चिखले, उपविभाग प्रमुख दिगंबर मोरे त्याचबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.